Social Initiatives - Chhatrapati Shahu Maharaj

Welcome to Shahumaharaj.com
Go to content

Social Initiatives

Monarchy > Visionary Reformist
१९५० साली आपल्या स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेच्या १७ व्या कलामाने अस्पृश्यता नष्ट केली. १९५५ साली मध्यवर्ती सरकार (भारत सरकार) ने एक देशव्यापी कायदा पास करून (दि. ८ मे १९५५ रोजी कायदा अंमलात आला)  अस्पृश्यता नष्ट केली. परंतु हा कायदा होण्याच्या २५ ते ५० वर्षे अगोदर शाहू महाराजानी आपल्या राज्यात असे कायदे केले होते. शाहू राजानी केलेल्या कायद्यांचा मूळ गाभा भारत सरकार ने देखील मान्य केलेला आहे.

२६ जुलै १९०२ रोजी एका आदेशान्वये आपल्या राज्यकारभारातील ५०% जागा मागासवर्गीयांसाठी राखून ठेवणारे शाहू महाराज हे हिंदुस्थानातील पहिले राजे ठरतात.

"असपृशयांना महाराजांनी जवळ घेतले. त्यांना आपल्या घोड्याच्या उघड्या खडखड्यात घेऊन गावात हिंडू लागले. मिरवणुकीच्या हत्तीचा माहूत अस्पृश्य नेमला. त्याला सोन्याच्या अंबारी पुढे ठेवला. अस्पृश्याना मोटार ड्रायव्हिंग कोर्स ला पाठवून आपल्या राणी साहेब, चिरंजीव आक्कासाहेब व युवराज यांच्या मोटारीवर नेमले. आपल्या पंक्तीत महार-मांग, चाम्भार यांना बसवू लागले. काहींना दरबारात सरदारी अंगरखा, तरवार पट्टा व जरीचा फेटा देऊन सरदार मानकऱयांच्या रांगेत नेऊन बसवले. पट्टेवाले शिपाई, डगलेवाले पोलीस, स्वात:चे शरीर संरक्षक अस्पृश्य नेमले. थोडेसे शिक्षण झालेल्याना त्या मानाने कारकून, तर काहींना वकिलीच्या सानंदा दिल्या".

१०० ते १२५ वर्षांपूर्वी शाहू रायांनी घालून दिलेला महान आदर्श आज देखील राज्यकर्त्यांसाठी अनुकरणीय आहे.

'राजर्षी शाहू गौरव ग्रंथ'
डॉ. रमेश जाधव,
कोल्हापूर.
Back to content