Quotes - Chhatrapati Shahu Maharaj

Welcome to Shahumaharaj.com
Go to content

Quotes

Monarchy
राजवैभव थोर असेल;
पण मी रयतेशी वचनबद्ध आहे.
ती वचनबद्धता त्या वैभवाहूनही थोर आहे.

- राजर्षी शाहू महाराज -
लोकांचा राजा म्हणून ज्याला जगायचे असते, त्याने स्वतःचे जीवन कवडीमोल मानायची तयारी ठेवाववी लागते, उपभोगशून्य स्वामी यासारखी सत्ताधीशाला सुंदर बिरुदावली नाही. शाहूमहाराजांना ती लाभलेली होती.

- पु. ल. देशपांडे -
ऐक्य, परस्पर प्रेम, विश्वास व चिकाटीचे सतत प्रयत्न
ही आमची शस्त्रे
असली पाहिजेत.

- राजर्षी शाहू महाराज -
"सर्व जातीच्या पुढाऱ्याना माझे सांगणे आहे की, आपली दृष्टी दूरवर ठेवा. जातीभेद मोडणे इष्ट आहे, जरूर आहे. जातीभेद पाळणे पाप आहे. देशोन्नतीच्या मार्गात हा अडथळा आहे. हा दूर करण्याचे प्रयत्न जोराने केले पाहिजेत, ही जाणीव पक्की ध्यानात ठेववून मग ह्या दिशेचा प्रयत्न म्हणून जाती परिषदा भरवावा. जातिबंधने दृढ करणे, जातीभेद तीव्र होणे हा परिणाम अशा परिषदांचा होऊ नये, ही खबरदारी घेतली पाहिजे".  
- राजर्षी शाहू महाराज -
नाशिक, १५ एप्रिल १९२०.
उदाजी मराठा वसतिगृह कोनशिला समारंभ प्रसंगी, नाशिक.
"आयुष्यभर मी अपार कष्ट केले आणि अथक उद्योग केला पण आजवरचा अनुभव मला असे सांगतो की माणसाजवळ मिळते घेणेचा समंजसपणा असल्याखेरीज त्याला यश मिळणे दुरापास्त असते".

सन १९२१, मेजर बेनसन यांना लिहिलेल्या इंग्रजी त्रामध्ये
शाहू महाराजानी सांगितलेले आयुष्यातील विविध अनुभवांचे सार.
ज्याच्या आयुष्याला उणेपुरे अर्धे शतकसुद्धा लाभले नाही त्या शाहू महाराजांची जन्मशताब्दी साजरी होत आहे.
१८७४ सालाचा जन्म आणि १९२२ सालचे मरण !
१८८४ साली युवराज झाले १८९४ साली महाराज झाले !
महाराजांचा २८ वर्षांचा काळ युगे अठ्ठावीस आठ्वावा असे म्हणतात !

- डॉ. बाबा आढाव -
साधना; राजर्षी शाहू जन्मशताब्दी कृतज्ञता अंक.
Back to content