Manifesto - Chhatrapati Shahu Maharaj

Welcome to Shahumaharaj.com
Go to content

Manifesto

Monarchy
On 2nd May 1894, Shahu Maharaj got a complete hold of the state government. On this day, Maharaj became 'major' by age. The rights of administration were handed over to him from 'council of administration'.

महाराजांचा जाहीरनामा
'स्वस्तिश्री राज्याभिषेक शके २२०, विजयनाम संवत्सरे फाल्गुन वद्य ११, इंदुवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा छत्रपती स्वामी यांजकडून -

या जाहीरनाम्याच्या द्वारे कोल्हापूर इलाख्यातील आमच्या तमाम प्रजाजनांस जाहीर करण्यात येते की, आजपर्यंत आम्ही अल्पवयी असल्याकारणाने कोल्हापूर संस्थानचा राज्यकारभार 'कौन्सिल ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन' यांच्या हातून चालवण्यात येत होता. परंतु आम्ही आता प्रौढावस्थेत आल्याकारणाने आज रोजी त्यांची कारकीर्द संपून आमच्या राज्याचा पूर्ण अख्त्यार आमच्या हाती आला आहे व त्याप्रमाणे आम्ही आज तारीख दोन माहे एप्रिल सन एक हजार आठशे चौऱ्याण्णव पासून तो चालवण्यास सुरुवात केली आहे.

आमची सर्व प्रजा सतत तृप्त राहून सुखी असावी, तिचे कल्याणाची सतत वृद्धी व्हावी व आमचे संस्थानची हर एक प्रकारे सदोदित भरभराट व्हावी, अशी आमची उत्कट इच्छा आहे. हा आमचा हेतू परिपूर्ण करण्यास आमच्या पदरचे सर्व लहान थोर जहागीरदार, आप्त, सरदार, मानकरी, इनामदार, कामगार, व्यापारी आदिकरून तमाम प्रजाजन शुद्ध अंत:करणापासून मोठ्या राजनिष्ठेने आम्हास सहाय्य करतील, अशी आमची पूर्ण उमेद आहे. ही आमची कारकीर्द दीर्घकाळापर्यंत चालवून सफल करावी, असे मी त्या जगन्नियंत्या परमात्म्याची एकभावें प्रार्थना करतो.'

कोल्हापूर, नवीन राजवाडा
तारीख २ एप्रिल १८९४.
The accession of Shahu Chhatrapati
Assending to the Seat of Power Ceremony
(April 2, 1894)

Back to content